१६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ

Subhash Desai

कार्य आणि कारकीर्द

सामाजिक
सामाजिक, राजकिय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत १९६२ पासून कार्यरत.
विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी ’प्रबोधन गोरेगाव’ संस्थेच्या माध्यमातून विविध योजना.
प्रबोधन क्रीडा भवन, प्रबोधन जॉगर्स पार्क, ओझोन जलतरण तलाव, ओझोन एक्टीव्हीटी सेन्टर, सौ. मीनाताई ठाकरे रक्‍तपेढी, प्रबोधन औषधपेढी या भव्य वास्तूंची मुंबई महानगरपालिकेच्या व म्हाडाच्या सहकार्याने उभारणी.
विशेषतः तरुण व नवोदित क्रीडापटूंना प्रशिक्षण तसेच क्रीडारसिकांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन.
रुग्ण्वाहिका सेवा, रक्तदान शिबिरे आणि गरींबांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन तसेच वैद्यकीय मदत

सांस्कृतिक
सावरकर महोत्सव, समर्थ उत्सव आदि हिंदू संस्कृति तसेच ऐतिहासिक महापुरुषांची ओळख करुन देणारे भव्य - दिव्य कार्यक्रम
मुंबई उपनगर साहित्य संमेलन १९७७ चे संयोजक-सचिव
’मुंबई फेस्टीवल’ या हिंदुस्थानी-शास्त्रीय संगीत महोत्सवाचे सलग ४ वर्षे आयोजन.
’हर्बल वर्ल्ड-२००२’, ’हर्बल वर्ल्ड २००३’ व हर्बल वर्ल्ड २००४’,या औषधी वनस्पती व पारंपारिक आरोग्याला वाहिलेल्या प्रदर्शन व चर्चासत्रांचे आयोजन.
राजकीय
शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसैनिक.
महाड येथील १९८५ मधील शिवसेनेच्या दुसऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशनाचे प्रमुख संयोजक.
ता. खेड, जिल्हा रत्नागिरी येथे कोकण रेल्वे परिषदेचे यशस्वी आयोजन.
’बॉम्बे’ आणि ’बंबई’ चे मुंबई नामकरण करण्यासाठी झालेल्या आंदोलनात सहभाग.
वेगवेगळ्या आंदोलनांत सहभागी झाल्याने अनेक खटल्यांना सामोरे जावे लागले.
पक्षाचा प्रचार आणि पक्षाच्या निवडणूक मोहिमांचे यशस्वी आयोजन.
जळगाव - रत्नागिरी - ठाणे आदि जिल्ह्यांचे संपर्कनेते पदाची जबाबदारी
ज्वलंत हिंदुत्व
गाजलेल्या विलेपार्ले पोटनिवडणुकीच्या प्रचारकार्याचे माननीय शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली यशस्वी नियोजन. हिंदुत्वाच्या मुद्यावर लढविलेल्या या निवडणुकीत शिवसेनेच ऐतिहासिक विजय
१९९० साली गोरेगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवड. ही सार्वत्रिक निवडणूक शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्यावर लढविली.
पुढे हिन्दुत्वाचा प्रचार केला या कारणाने न्यायालयाकडून निवडणूक रद्द. सहा वर्षे निवडणूक लढविण्यावर बंदी.
ब्र. विश्‍वनाथजी यांच्या शुद्धी चळवळीत सहभाग. मुस्लिम गुंडांनी पळवून नेलेल्या हिंदू मुलींची सुटका करुन त्यांचे मसुराश्रमात शुद्धीकरण करण्याच्या अनेक मोहिम यशस्वी.
गोरेगाव येथे गाजलेल्या वासरी डोंगरी गणेशोत्सवात हिंदूंच्या न्याय्य हक्कासाठी आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व
गोवंश हत्या निषेधार्थ राजस्थानात झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग. गोवंशरक्षक हुतात्मा मुरली बोहरा यांचे स्मारक उभारण्यात पुढाकार
आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे लिखाण दै. सामनातून प्रकाशित केल्यावरुन उच्च न्यायालयात तसेच मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर येथील न्यायालयांमध्ये अगणित खटल्यांची प्रकरणे
२००४ साली गोरेगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवड.
पुरस्कार
’महाराष्ट्र-रत्न’ - महाराष्ट्र कलानिकेतन, मुंबई
’धर्मवीर’ - संभाजी प्रतिष्ठान, पुणे