१६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ

Subhash Desai

क्रीडा

भारतातही क्रीडाक्षेत्रातील नैपुण्य आहे परंतु गरज आहे ती योग्य त्या सेवा-सुवीधांची. या क्रीडागुणांना जोपासण्यासाठी आवश्यक ती साधन-सामग्री, शास्त्रशुद्ध पद्धतीने विकसित केलेली मैदाने व योग्य तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्याची. क्रीडागुण हे शास्त्रशुद्ध पद्धतीने जोपासावे लागतात. त्यासाठी लागणार्‍या दर्जेदार सेवा सुवीधा पुरविण्यासाठी श्री. सुभाष देसाई सदैव तत्पर असतात.

त्यांनी उभारलेले सुसज्ज व सुनियोजीत प्रबोधन क्रीडाभवन आज क्रीडापटुंचे माहेरघर बनले आहे आणि गोरेगावची ओळख! अनेक नामवंत यशस्वी क्रीडापटुंचा या क्षेत्रातील प्रवास सुरु होण्यासाठी, त्यांच्यातील सुप्त क्रीडागुणांना संधी मिळवून देण्यासाठी, एवढेच नाही तर त्यांना त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी पुरविण्यासाठी श्री. सुभाष देसाई यांचे योगदान प्रशंसनीय आहे.

त्यांचा दृष्टीकोन हा कधीही ’केल्याने होत आहेरे – आधी केलेची पाहिजे’ हाच राहिला आहे. प्रबोधन क्रीडाभवन आज अखील मुंबईकरांच्या क्रीडाक्षेत्रातील मानबिंदू बनला आहे. तत्पूर्वी मुंबईतील उपनगरवासीयांना क्रीडामैदानही सापडणे दुर्पास्त झाले होते. क्रीडाभवन ने ही मोठी अडचण दूर केलीच तसेच अनेकाविध सुविधादेखील तेथे उपलब्ध करुन देण्यात आल्या. केवळ सुविधाच नव्हे तर निष्णात व्यक्तींचे मार्गदर्शन माफक दरात उपलब्ध करुन देऊन श्री. देसाई यांनी क्रीडापटुंना खर्‍या अर्थाने आधार दिला. एवढेच नाही तर नानाविध स्पर्धांद्वारे जन्मजात मिळालेले व प्रबोधनच्या मदतीने जोपासलेले क्रीडानैपुण्य दाखविण्यासाठी – आजमवण्यासाठी – वाढविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ देखील उपलब्ध करुन दिले.

ऑलिम्पिक – एशियाड आदि जागतिक दर्जाच्या क्रीडास्पर्धांमध्ये भारताच्या क्रीडापटुंनी जग चकित होईल अशी कामगिरी करुन दाखवावी’ हे स्वप्न उराशी बाळगुन श्री. देसाई यांनी अनेकाविध उपक्रम आजवर राबविलेले आहेत.