१६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ

Subhash Desai

सामाजिक कार्य

श्री. सुभाष देसाई यांच्या मतानुसार आपल्या देशाला शक्‍तीशाली बनवण्यासाठी प्रत्येक समाजघटकाला शक्‍तीशाली बनवणे गरजेचे आहे. यासाठी वंचित समाजघटकांकडे खास लक्ष पुरवुन त्यांना आपल्या सोबत घेवुन उज्वल भविष्याकडे वाटचाल करणे गरजेचे आहे. गरजूंना मदत करण्यास श्री. देसाई प्रसिध्द आहेत. कमकुवत वंचित घटकांवर जास्त लक्ष पुरवुन त्यांना वंचितपणाच्या भावनेपासुन दुर ठेवण्याकडे श्री. सुभाष देसाई यांचा कल असतो.

अपंग लोक आणि त्यांची भावुकता ही श्री. देसाई यांची प्रेरणा असुन त्यांनी अपंगाना खुप मदत पुरवली आहे. त्याचप्रमाणे वृद्ध नागरिकांना उत्तमोत्तम सुविधा पुरवण्यासाठीही श्री. देसाई सतत प्रयत्नशिल असतात. ज्या स्त्रिया स्वदुर्लक्षामुळे अथवा आर्थीक परिस्थितीमुळे तांत्रिक ज्ञान घेऊ शकत नाहीत अशांबद्दल सुद्धा श्री. सुभाष देसाई जागरुक आहेत. वंचित (दुर्लक्षित) घटकांसाठी श्री. देसाई हे उदार मनाची, दयाळु, मानवतेबद्दल कणव असणारी व्यक्‍ती आहे.