१६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ

Subhash Desai

आरोग्य

वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून समाजकार्य करणे हा श्री. सुभाष देसाई यांचा एक वैशिष्ट्यपुर्ण पैलु आहे. लोकांप्रती त्यांचा दृष्टीकोन हा “चांगले आरोग्यदायी जीवन हा प्रत्येकाचा मुलभुत दृष्टीकोन आहे. जेव्हा ते लोकांच्या सामाजिक गरजांबद्दल व शारिरिक अवस्थेविषयी विचार करतात तेव्हा भावुक होतात. ते त्यांच्या वेगवेगळ्या संकल्पनेसाठी गोरेगावकरांमधे प्रसिध्द आहेत. त्यांच्या संकल्पना फक्‍त गोरेगावकरचं नाही तर सर्व मुंबईकरांचे जीवन वाचवण्यास उपयुक्‍त ठरल्या आहेत. विविध स्वास्थ सेवांचे ते निर्माणकार आहेत.

“बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” ही उक्‍ती श्री. सुभाष देसाई यांना तंतोतंत लागू पडते. आरोग्यपुर्ण समाजाचे स्वप्न साकार करण्याच्या मार्गावर यांचा प्रवास सुरु आहे.

गरजुच्या विकासासाठी…. मानवतेवरचा विश्वास दृढ होण्यासाठी….. श्री. सुभाष देसाई यांचे गरजुंना मदत करण्याचे अविश्रांत- अविरत कार्यव्रत सुरुच आहे. अशा असामान्य व्यक्‍तींमुळे माणसाच्या माणुसकीवरील विश्वास दुणावतो.