१६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ

Subhash Desai

न्यायासाठी लढाई

गोरेगाव रेल्वे क्रॉसिंगवर पूल बांधण्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न.

२६ ऑक्टोबर २००७ रोजी सायंकाळी गोरेगाव, जवाहरनगर रेल्वे फाटकाजवळ चर्चगेटला जाणाऱ्या लोकलखाली चिरडून ५ वर्षांची उन्नती त्रिपाठी ह्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला, तर तिची आजी निर्मल त्रिपाठी व मन्सूर अली हे दोघे गंभीर जखमी झाले. गोरेगावचे शिवसेना आमदार श्री. सुभाष देसाई व सभागृह नेते श्री. सुनिल प्रभू यांनी घटनास्थळी जाऊन जमलेल्या जमावास शांत केले व रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी तातडीची बैठक घेऊन सदर प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी चर्चा केली. रेल्वे ओलांडण्यासाठी एक फूट ओव्हर ब्रीज तात्काळ बांधला जावा तसेच बंद असलेल्या फाटकाजवळ पादचाऱ्यांना रुळ ओलंडता यावेत म्हणून तेथील खड्डे बुजविण्याचे व छोटी जागा मोकळी ठेवण्याचे व तेथे रेल्वे कर्मचारी व रेल्वे पोलिस नियुक्‍त करण्याचे देखील ठरले. त्वरित महापालिकेने रेल्वेकडे द्यावयाची रक्कम अदा केली जाईल व तसे पत्र देखील दिले जाईल असे देखील ठरवण्यात आले.

सदर पुलामुळे नागरिकांना सुरक्षित जीवन जगण्यासाठी  जनतेच्या सुरक्षेच्या प्रति सदर सुभाष देसाई यांच्या प्रयत्नांमुळेच हे काम यशस्वी होऊ शकले.