१६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ

Subhash Desai

शैक्षणिक उपक्रम

उच्च नितीमुल्ये असणारे श्री. सुभाष देसाई समाजाच्या शिक्षणाबाबत खुप उत्साही आहेत. त्यांच्या मतानुसार संपूर्ण शिक्षणामध्ये नितीमूल्ये आणि व्यक्तीचा सर्वांगिण विकास अंर्तभुत होतो. शालेय शिक्षणावर आधरित पवित्र मुल्ये, ऐतिहासिक संदर्भ, संतांची शिकवण आणि प्रत्यक्ष अनुभव हे शिक्षणाचे अविभाज्य भाग आहेत.

जर शालेय शिक्षणामध्ये वरील सर्व मूल्यांचा अंतर्भाव असेल तर तयार झालेले व्यक्तिमत्व, मनाची शक्‍ति आणि ज्ञानाच्या विस्तारलेल्या कक्षा आपल्या येणार्‍या पिढीला सुविचारी आणि अचूक निर्णयक्षम बनवेल. शिक्षणामधे नितीतत्व, कौशल्ये आणि सामान्य ज्ञान यांचा समावेश होतो तसेच तयार होणारा दृष्टीकोन हा रुंद आणि महत्वाचा होतो. एका परिपूर्ण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत शिक्षणाचे निर्विवाद महत्व आहे.

शिक्षणातुन व्यक्तिला बाह्य जगाचे ज्ञान, समजुतदारपणा आणि इतिहासाचा देखील परिचय व्हायला हवा, जेणेकरुन ती व्यक्ति वर्तमानाचा अचूक अंदाज घेऊन उज्वल भविष्याकडे वाटचाल करेल.