१६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ

Subhash Desai

सांस्कृतिक वारसा

संस्कृतिची जोपासना हे सुभाष देसाई यांच्या समाजकार्याचे ब्रीदवाक्य राहिले आहे. नवीन पिढीला आपल्या अनमोल संस्कृतिची तसेच इतिहासाची ओळख करुन देण्यात ते नेहमीच सजग राहिले आहेत. त्याचमुळे विविध कार्यक्रमांद्वारे ते या सांस्कृतिक ठेव्याची समाजास ओळख करुन देत असतात. त्यांच्या नियोजनबद्ध व भव्य-दिव्य कार्यक्रमांमुळे गोरेगावास एका वेगळ्याच सांस्कृतिक विश्वाची सैर घडत असते.

भव्य समर्थ उत्सवाच्या रुपाने संत रामदासांचे विचार व उपदेश लोकांपर्यंत पोंचविण्यात ते यशस्वी ठरले. सावरकर उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी या ऐतिहासिक पुरुषाच्या विचारांचा, जीवनपटाचा अनमोल खजिनाच लोकांसमोर सादर केला. मुंबई फेस्टिव्हल, हर्बल वर्ल्ड यांसारख्या वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमातून ते कायमचं गोरेगावकरांना सांस्कृतिक जगतात घेऊन जात असतात. गोरेगावकरांचे केवळ आरोग्य व शिक्षणच नाही तर सर्वांगिण प्रगतिसाठी झटणारे सुभाष देसाई म्हणूनचं गोरेगावकरांना प्रिय आहेत.