१६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ

Subhash Desai

ध्येय व धोरणे

ध्येय
आम्ही हिंदुस्थानी आहोत म्हणुन हिंदुत्व हा आमच्या पक्षाचा मुख्य पाया आहे.
ह्या राष्ट्राच्या विरोधात असणाऱ्यांशी शिवसेनेची लढाई ही अखंड चालू राहील.
स्वत:च्या हक्कासाठी उभारणीसाठी शिवसेना नेहमी प्रोत्साहन देईल.
समाजसेवा व सामाजिक ऎक्य हेच समाज विकासाचे मार्ग आहेत असा शिवसेनेचा ठाम विश्वास आहे म्हणुन सक्रीय राजकारणापेक्षा जास्त सामाजिक चळवळीवर शिवसेनेचा अधिक भर आहे.
धर्म, जात व भाषा ह्यामधल्या किरकोळ मतभेदांवर शिवसेनेचा बिलकुल विश्वास नाही. उलट ह्याला कुणीही बळी पडू नये अशीच शिवसेनेची शिकवणूक आहे.
राज्याच्या अधिकृत भाषेमध्ये तरुणांना शिक्षण मिळावयास हवे.

धोरणे
मातृभूमिबद्दल असलेल्या जबाबदाऱ्या व कर्तव्य ह्याची जाणीव असलेला शक्‍तिमान, ताठ मानेने चालणारा तसेच सुसंकृत तरुण उभा करणे.
मातृभूमिसाठी केव्हाही कसलाही त्याग करावयास तयार असलेली एक शक्तिशाली संघटना निर्माण करणे.
राजकारण वा सत्ता नव्हे तर समाजसेवा हेच अंतीम ध्येय आहे, अशी भावना समाजात निर्माण करणे.
समाजविघातक, राष्ट्रविघातक शक्‍तिविरुध्द तसेच भ्रष्टाचार, अयोग्य व लालफितीत अडकलेले प्रशासनाच्या विरोधात ठामपणे मुकाबला करण्याची एक जाणीव समाजामध्ये निर्माण करणे.
युवापीढीमधील नैराश्य हटवून त्याच्या मनामध्ये असा आत्मविश्वास निर्माण करणे की ते बेकारी, अशिक्षीतपणा व गरीबीविरुध्द लढा देउ शकतील. त्याना शिक्षण व विविध क्षेत्रात प्रशिक्षण देणे.
राष्ट्रीय हितसंबंध जपणे, कायद्याला मान देणे व संपूर्ण राष्ट्रासाठी सक्रीय सामाजिक कायदा असावा ह्याबद्दल आग्रही असणे.
समाजामध्ये बंधुत्व, एकसंधपणा व सुसंवाद प्रस्थापीत करणे.