१६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ

Subhash Desai

सावरकर उत्सव

जय महाराष्ट्र !

ज्वलंत हिंदुत्वाचे मूर्तिमंत रूप म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. हजारो वर्षे पारतंत्र्यात पिचत पडल्यामुळे पाठीचा कणा मोडलेल्या आणि आत्मविश्वास गमावलेल्या हिंदूंमध्ये क्रांतीचे स्फ़ुल्लिंग चेतविताना स्वत:च्याच आयुष्याची होळी पेटविणारा एकमेव क्रांतिकारक म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर याबाबत दुमत असण्याचे कारणच नाही. सावरकरांचे हे माहात्म्य पटूनही त्याबाबतचा उच्चार व आचार करतांना लक्षावधी हिंदू दबलेल्या सुरात बोलताना – वागताना दिसतात. दुसरीकडे काही अहंमन्य पुढारी स्वातंत्र्यवीरांचे ॠण मानण्याऎवजी त्यांच्या चरित्रावर व चारित्र्यावर चिखलफ़ेक करण्यात धन्यता मानतात.

या शतपैलू महर्षीचे यथार्थ दर्शन नव्या पिढीला व्हावे म्हणून सावरकर जयंतीचा योग साधून दि. २७, २८, २९ मे २००५ दरम्यान मी आणि माझ्या प्रबोधन गोरेगाव संस्थेने तसेच सावरकरप्रेमी नागरिकांनी गोरेगाव, मुंबई येथे भव्य-दिव्य सावरकर उत्सव आयोजित केला. या उत्सवात साहित्य, चित्रपट, महारांगोळी, चर्चासत्र, वक्‍तॄत्व स्पर्धा, नाट्यप्रवेश व संगीत या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला गेला. एका भव्य शोभायात्रेचेही आयोजन करण्यात आले होते.