१६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ

Subhash Desai

रिलायन्स, टाटा आणि महावितरणाविरुध्द उग्र आंदोलन

भरमसाठ वीज दरवाढ करुन मुंबईकरांची लुटमार करणाऱ्या रिलायन्स एनर्जी, टाटा, बेस्ट आणि महावितरण या वीज कंपन्यांविरूद्ध आज आंदोलनाचा वणवा भडकला. वीज भरणा केंद्र आणि वीज कंपन्यांच्या कार्यालयांवर ठिकठिकाणी हजारो शिवसैनीकांनी चाल करुन जात जबरदस्त भगवा झटका दिला. तोडफ़ोड, दगडफ़ेक, वीज बिलांची जाहीर होळी करत वीज कंपन्यांना शिवसेनेने ’शॉक ट्रीटमेंट दिली. गोरेगावात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांवर पोलिसांनी निर्दयपणे लाठया चालवल्या. आंनदोलनात १७ शिवसैनीक जखमी झाले असून शिवसेना नेते आमदार सुभाष देसाई, गजानन कीर्तीकर यांच्यासह शेकडो शिवसैनिकांना अटक नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.

मालाड, गोरेगाव, कांदिवली विभागात शिवसेना नेते आमदार सुभाष देसाई, गजानन कीर्तिकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जबरदस्त आंदोलन छेडले. हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. मालाड, गोरेगाव येथील शिवसैनिकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. सुभाष देसाई, गजानन कीर्तिकर यांच्यासह सभागृहनेते सुनील प्रभू यांना अटक करुन जामिनावर सुटका करण्यात आली. संतप्त शिवसैनिकांनी कांदिवली येथे रिलायन्सच्या टेम्पो व लॉरीची तोडफ़ोड करुन पेटवून दिले. या आंदोलनात उपनेते विभागप्रमुख विनोद घोसाळकर, उपविभागप्रमुख विलास पोतनीस , अजय नाईक, नगरसेवक दिलीप शिंदे, शांताराम कोलते, विभाक संघटक साधना माने तसेच हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते.