१६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ

Subhash Desai

फेरीवाल्यां विरुद्ध आंदोलन

शिवसेनेतर्फे शनिवार, दि. २० डिसेंबर २००८ रोजी सकळी १०.०० वाजता गोरेगाव (पुर्व) रेल्वे स्टेशन बाहेर आंदोलनाची तुतारी फ़ुंकण्यात आली. या आंदोलनात सर्वश्री सुभाष देसाई, शिवसेना नेते, व आमदार गजानन कीर्तिकर, शिवसेना नेते, व आमदार, सुनील प्रभू सभागृह नेते, महानगरपालिका अजय नाईक, उपविभागप्रमुख, सौ. सुधा टेंबवलकर, महिला उपविभाग संघटक शांतू भोसले, नगरसेवक सौ. नम्रता कोलथरकर स्वप्नील टेंबवलकर, शाखाप्रमुख, सौ. शमा गुप्ते, महिला शाखासंघटक तसेच गोरेगावातील समस्त उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक, महिला आघाडी व भारतीय विद्ध्यर्थी सेनेचे युवक सामील झाले होते.

गोरेगाव रेल्वे स्थानकालगत फ़ेरीवाल्यांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर असून संबंधित यंत्रणा त्यांच्याविरुद्ध कारवाई करत नसल्यामुळे पादचाऱ्यांना तसेच प्रवासांना त्रास होत आहे त्याच्याविरोधात शिवसेनेच्यावतीने गोरेगाव रेल्वेस्थानकालगत साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना नेते व आमदार सुभष देसाई यांनी केले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई झलीच पाहिजे, तसे न झाल्यास यापुढील आंदोलनं तीव्र स्वरुपाची होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला. गोरेगाव स्टेशन परिसरातील रस्ते मुळातचं अरुंद असून रेल्वे, बसेस, मोटारी आणि रिक्षांचे प्रवासी व पादचाऱ्यांना या ठिकानी जाणे - येणे प्रचंड त्रासाचे होत आहे. फेरीवाल्यांनी भर टाकू फार मोठी अडचन निर्माण केली आहे. त्या हटविण्यासाठी रेल्वे, पालिका प्रशासन, वाहतूक विभाग व पोलीस यांचा सामुहिक प्रयत्‍नांची गरज आहे. याबाबत संबंधितांना वारंवार पत्रव्यवहार करुनही कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळेच शिवसेना सलग चौथ्यांदा हे आंदोलन करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्टेशन परिसरातील फेरीवाले हटवा, ऑटो रिक्षा एकाच रांगेत चालल्या पाहिजेत, गुरांचा बाजार हटवून तेथे शासकीय कार्यालये, सभागृह व भाजीपाल्यांची दुकाने यासाठी संकुले बांधा, एमएमआरडीए, एम एम आरदीसीतर्फे रेल्वे स्थानकात जाणे – येणे सुलभ व्हावे, यासाठी स्काय वॉक बांधा, या शिवसेनेच्या प्रमुख मागण्या आहेत.