प्रबोधन गोरेगाव संस्थेतर्फ़े आजवर अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले गेले असून ते यशस्वी झाले आहेत.हे आपणास माहीतच आहे.आता प्रबोधनतर्फ़े समाजाच्या सर्व स्तरातील आबालवृध्दांसाठी आम्ही औषध पेढीचे (मेडीकल) दुकान गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर सुरू केले आहे.ही औषधे पेढी सुरू करण्यामागचा मुळ उद्देश रूग्णांना दैनंदिन लागणारी औषधे खात्रीची आणि सवलतीत मिळावीत असा आहे.
यासाठीच औषधपेढी सभासदांसाठी एक योजना आखली आहे.या योजनेत १ वर्षाच्या कालावधीसाठी रु.५०/-शुल्क असेल.सभासद झाल्यावर आपणास जीवन मित्र कार्ड देण्यात येईल.सदरहु कार्ड आपल्या कुटुंबातील कोणीही वापरू शकेल.विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना १० % व ६० वर्षांखालील नागरिकांना ५ % सवलत देण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष येणे शक्य नसल्यास महिन्याभराची औषधे विनामूल्य घरपोच (गोरेगावात) देण्याची व्यवस्था केली जाईल.
मुख्य म्हणजे सर्व औषधांची खरेदी नामांकित कंपेनीच्या वितरकाकडून केल्यामुळे प्रमाणित औषधे मिळण्याची खात्री.आपण फ़क्त सभासद व्हा व खर्च नियंत्रणाची काळजी आमच्यावर सोडा.औषधे आणि सर्जिकल वस्तूं बरोबर दैनंदिन गरजेच्या वस्तू उदा.टूथपेस्ट,फ़ेस पावडर,क्रिम्स,बोर्नव्हिटा इ.उत्पादनेही उपलब्ध असणार आहेत परंतु या वस्तूंवर सवलत असणार नाही.
अनेक जण सांगतात की औषधविक्रेते आम्हांला सवलत देतात पण ते सवलत देतात ते महिन्याभराची औषधे एकदम खरेदी केल्यावर व विनंती केल्यावर.आम्ही आपल्या सेवेत हजर असू कुठच्याही अटीविना.या प्रकल्पाचा मूळ हेतू असा आहे की आपण आपले ओळखपत्र (कार्ड) दाखविल्यावर आपल्याला सन्मानपूर्वक सवलत दिली जाईल.
औषधपेढीत होणाऱ्या निव्वळ नफ़्यातून गरजू रूग्णांना जास्तीत जास्त सवलत दिली जाईल आणि आर्थिक दुर्बल रूग्णांना मोफ़त औषध
सेवा तसेच सर्जिकल उपकरणे पुरवली जातील.आपण या योजनेचे सभासद होणे म्हणजे एक पुण्यकर्म आहे.
प्रबोधनने अंगीकारलेल्या या जनसेवेच्या व्रतात आपणही जीवन मित्र सभासदत्व स्विकारून आपला खारीचा वाटा निश्चितच उचलाल व समाजातील गरजूंना जीवनदान देऊन ही योजना यशस्वी कराल अशी आशा नव्हे खात्री वाटते.
लोभ आहेच तो वृध्दींगत व्हावा ही नम्र विनंती.
आपला नम्र,
सुभाष देसाई
संस्थापक,प्रबोधन गोरेगाव
शिवसेना नेते,आमदार
|