|
 |
श्री. सुभाष देसाई यांनी बुद्धिबळ खेळास चालना देणारे अनेकाविध उपक्रम गोरेगावकरांकरिता राबविले आहेत. प्रबोधन जॉगर्स पार्कच्या वास्तूमध्ये त्यांनी बुद्धिबळाचे शास्त्रीय प्रशिक्षण घेऊ इच्छिणार्या मुलांसाठी खास बुद्धिबळ प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. सदर केंद्रात अनुभवी प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे डावपेच, त्यातील खाचाखोचा तसेच नियमांची माहिती दिली जाते.
प्रबोधन आंतरराष्ट्रीय ’फिडे’ रेटींग बुद्धीबळ स्पर्धा आयोजित करुन तर श्री. सुभाष देसाई यांनी बुद्धिबळप्रेमी गोरेगावकरांना अनोखीच भेट दिली. या स्पर्धेस मिळालेल्या प्रचंड प्रतिसादातूनच बुद्धिबळपटूंचा उत्साह दिसून आला. श्री. सुभाष देसाई यांना देखील या स्पर्धेस मिळालेल्या प्रतिसादामुळे खुप आनंद झाला. बुद्धीबळपटुंसाठी अशाच प्रकारच्या स्पर्धा यापूढे देखील नियमीत स्वरुपात आयोजित करण्याचा श्री. सुभाष देसाई यांचा मानस आहे.
|
|