१६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ

Subhash Desai

प्रबोधन गोरेगाव

’प्रबोधन – गोरेगाव’, ही संस्था १९७२ पासुन ज्ञान, कला, क्रिडा आणि सामजिक सेवेत महाराष्ट्रात अग्रेसर आहे. प्रबोधन म्हणजे शिक्षणातून जाग्रुती’

आज संस्थेतर्फ़े कार्यान्वित असलेल्या क्रिडाभवन , जॉगर्सपार्क , अत्याधुनिक उपकरणे असलेली मीनाताई ठाकरे रक्तपेढी तसेच रक्तवाहिनी ( फ़िरते रक्त संकलन), ओझोन जलतरण तलाव आणि एक्टिवीटी सेंटर, वाचनालय , औषधपेढी या सेवांचा गोरेगाव परिसरातीलच नव्हे तर मुंबईतील तसेच महाराष्ट्रातील अनेक लोक लाभ घेत आहेत.प्रबोधन गोरेगाव आपल्या मूलभूत तत्वांशी – कला, क्रिडा, ज्ञान, सेवा यांच्याशी कायम कटीबद्ध आहे. आज पर्यंत प्रबोधनने अनेकाविध उपक्रम राबविले.

क्रिडा क्षेत्रातील प्रबोधनची घोडदौड सर्वश्रुत आहे. भव्य-दिव्य समाजिक- सांस्कॄतिक अनेकाविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करुन प्रबोधनने पश्चिम उपनगरातील लोकांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटविला आहे. ज्ञानामुळे माणूस घडतो. ज्ञानामुळे घडलेला माणुस एक सशक्त सुसंस्कृत समाज घडवतो. माणसं घडविणारे, माणसांच्या विचारांना चालना देणारे कार्यक्रम, उपक्रम प्रबोधन पहिल्यापासून राबवित आहे. जनसेवेच्या मार्गात प्रबोधनच्या यापूढील प्रवासात आपले कुठलेही योगदान स्वागतार्ह आहे.