Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Subhash Desai Shivsena Leader Goregaon
 
     
Subhash Desai Shivsena Leader क्रिडाक्षेत्राप्रति दृष्टीकोन :  
Subhash Desai Shivsena Leader उपक्रम :  
  - प्रबोधन क्रिडाभवन  
  - ट्वेन्टी - २० क्रिकेट  
  - आंतरराष्ट्रीय फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा  
  - आंतरशालेय क्रिडामहोत्सव  
  - उन्हाळी प्रशिक्षण शिबीर  
  - प्रोजेक्ट २०००  
Subhash Desai Shivsena Leader

खेळाडुंना मिळणार्‍या अपुर्‍या सुविधा व योग्य प्रशिक्षकांची गरज ओळखुन १९९१ मधे श्री. सुभाष देसाई यांनी गोरेगाव उपनगरात प्रबोधन क्रीडाभवनाची शिला रोवली, आणि क्रीडापटुंना एक हक्काचे सर्व सोयी-सुविधा युक्त मैदान उपलब्ध झाले. या क्रीडाभवनाचा उद्‍घाटन समारंभ ‘त्रिपुरी पौर्णिमे’च्या ( गुरुनानक जयंतीच्या दिवशी) शुभमुहूर्तावर गुरुवार दि. २१ नोव्हेंबर १९९१ रोजी माननीय शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते झाला. दि. १ जानेवारी १९९२ पासून क्रीडाभवनाच्या सर्व सुविधा सुरु करण्यात आल्या. स्टीमबाथ व झाकुझी यांसारख्या अत्याधुनिक सोयींनी युक्त असे आरोग्य केंद्र, अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशी व्यायामशाळा, टेबलटेनिस, क्रीकेट, कॅरम व बुद्धिबळ यासारखे खेळ, त्याचप्रमाणे योगकेंद्र, कराटे प्रशिक्षण केंद्र इत्यादी सर्व सुविधा क्रीडाभवनात उपलब्ध करून देण्यात आल्या.
सदर क्रीडाभवनामध्ये क्रिकेट, जिम्नॅस्टीक, ऍथलेटिक्स, टेनीस, योगशास्त्र, कराटे, खो खो, कबड्डी आदि विविध क्रीडाप्रकारांचे दर्जेदार शास्त्रशुद्ध शिक्षण निष्णात प्रशिक्षकांद्वारे अतिशय माफक दरात सर्व सोयी-सुविधांसह पुरवीले जाते.
गोरेगावच्या पटलावरील हा मानबिंदू केवळ गोरेगावकरांच्याच नव्हे तर अखील मुंबईतील खेळाडूंसाठी एक जिव्हाळ्याचे ठिकाण बनला आहे.