प्रबोधन गोरेगाव संस्थेमुळे गोरेगावला मोठ्या, सुसज्ज अशा क्रीडामैदानाचे वरदानच लाभले आहे. क्रीडामैदानाची विशाल वास्तू, नियोजनबद्ध आखणी व काळजीपूर्वक करण्यात आलेली देखभाल यांमुळे सर्वार्थाने ही वास्तु मोठ्या क्रीडास्पर्धांसाठी आदर्श ठरली आहे. श्री. सुभाष देसाई यांनी या मैदानावर प्रथम आंतरशालेय क्रीडा स्पर्धा १९७९ साली भरवुन भवीष्यातील क्रीडास्पर्धांसाठी आदर्श अशा वास्तुचा पाठच घालून दिला. प्रबोधन गोरेगावचा हा क्रीडास्पर्धा आयोजित करण्याचा प्रथमच प्रयत्न सर्व तरुण स्पर्धकांच्या, शाळा तसेच उपस्थितांच्या मनाचा ठाव घेऊन गेला. उपस्थितांच्या जल्लोश व टाळ्यांनी स्पर्धेतील उत्साह शिगेला पोंचविण्यास मदतच केली. या प्रथम क्रीडास्पर्धेच्या नियोजन व शिस्तबद्धतेमुळे ह्याला जणू छोटेखानी ऑलिम्पिकचेच स्वरुप प्राप्त करुन दिले. २२ शाळांमधील ८०० विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत भाग घेतला.
श्री. सुभाष देसाई यांचा नेमकेपणा व नियोजनबद्धता यांमुळे या स्पर्धा सर्वच दृष्टीने परिपूर्ण व यशस्वी ठरतात. दरवर्षी प्रबोधन क्रीडाभवनात भरविल्या जाणार्या या स्पर्धा खर्या अर्थाने गोरेगावचे भूषण ठरल्या आहेत. या स्पर्धांमुळे क्रीडाप्रकारांमधे स्वारस्य व गती असणार्या अनेक विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. क्रीडापटुंसाठी मैलाचा दगड म्हणून ख्याती असणार्या ह्या स्पर्धेची वाट केवळ क्रीडापटुच नव्हे तर शाळा तसेच प्रेक्षकदेखील आतुरतेने बघत असतात.
आंतरशालेय क्रीडा स्पर्धांद्वारे क्रीडापटूना संधी उपलब्ध करुन देणार्या प्रबोधन गोरेगाव संस्था व संस्थेचे संस्थापक श्री. सुभाष देसाई यांच्याप्रति असणारी क्रीडापटु, त्यांचे पालक व क्रीडाप्रेमी यांच्या भावना शब्दातीत आहेत.
|