|
 |
थॅलेसेमिया- एक आनुवांशिक रक्त विकार. ज्याच्यामुळे रोगींना नियमित रक्त संचरण करावे लागते कारण रोग्याचे शरीर पुरेसे हिमोग्लोबिन तयार करत नाही. हा आनुवांशिक विकार आहे.
सर्व रक्तपेशी अतिआवश्यक ऑक्सिजनायझेशनचे काम करतात. रक्तपेशींमधे असणाऱ्या ‘हिमोग्लोबीन’ या घटकांमधे विविध प्रकारची प्रथीने असतात. व्यक्तीची हिमोग्लोबीन रचना त्याच्या गुणसूत्रांवर अवलंबुन असते.
ऍनेमिक लोकांना थॅलेसेमिया होण्याची जास्त शक्यता असते. श्री. सुभाष देसाई यांनी सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढी, गोरेगाव येथे थॅलेसेमिया सेंटर सुरु केले. या केंद्रात माफक दरात वैद्यकिय उपचार पुरवले जातात. हे केंद्र रक्त संचरण सुविधा पुरवते. हे केंद्र वातानुकुलित असुन येथे रुग्णाला विनाकाळजी उपचार घेता यावेत म्हणुन टी. व्ही. व्हीविंग सुविधा उपलब्ध आहे.
|
|