आर्थिकदृष्ट्या गरीब लोक पैशाअभावी वैद्यकिय तपासणी करु शकत नाहीत नियमीत वैद्यकिय सल्ला शिबिरे, रक्तदान शिबिरे, विशिष्ट रोग शिबिर, श्री. सुभाष देसाई यांनी आयोजित केली आहेत. ही शिबिरे गोरेगावकरांना खुप लाभदायक ठरली आहेत. श्री. सुभाष देसाई यांनी सिध्दार्थ हॉस्पीटलच्या रुग्णांना मोफत वस्तु वाटपाद्वारे नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच लोकांना मोफत चष्मा वाटपाचा उपक्रम ही त्यांनी राबवाला आहे. श्री सुभाष देसाई हे गोरेगावकरांच्या आरोग्यविषयक गरजां पुर्ण करण्याकडे नेहमीच लक्ष देतात.
|