Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Subhash Desai Shivsena Leader Goregaon
 
     
Subhash Desai Shivsena Leader गरजूंसाठी समाजिक उपक्रम  
       
  - स्त्रियांसाठी  
       
  - अपंगासाठी  
       
  - ज्येष्ठ नागरिकांकरता  
       
Subhash Desai Shivsena Leader

               श्री. सुभाष देसाई यांच्या मताप्रमाणे अपंग/ विकलांग लोकांना समाजातील मुळ प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येक व्यक्‍तीने शक्य ते प्रयत्न घ्यायला हवेत. यासाठी या विकलांग/ अपंग लोकांकडे खास लक्ष पुरवले पाहिजे. समाजातील गरजू घटकांना मदत पुरवण्यासाठी श्री. देसाई हे नेहमी प्रयत्नशिल राहिले आहेत. अपंग लोकांबद्दल श्री. देसाई फार भावुक आहेत आणि त्यांचा हाच भावुकपणा अपंग लोकांसाठी मदतीचा सशक्‍त हात पुरवण्यामागची प्रेरणा आहे. श्री. देसाई यांनी अपंगांसाठी खुप उपक्रम राबवले आहेत. सर्व अपंगांना एकत्र आणण्याचा महत्वपुर्ण निर्णय श्री. देसाई यांनी घेतला,जेणेकरुन त्यांना अचूक मदत पुरवणे सोपे जावे व अधिकाधिक लोकांना त्याचा लाभ घेता यावा. केंद्रीय आधार मुखत्यारी कडुन अपंगांना मार्गदर्शन पुरावण्यापासुन ते अपंगासाठी विजय मर्चंग अपंग पुर्नवसन संस्था स्थापन करण्यापर्यंत श्री. देसाई यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. श्री. देसाई अपंगांच्या अडचणी दुर करण्यासाठी स्वतंत्र विभागाची स्थापना केली आहे.
मुंबई महानगरपालिकेतर्फे अपंगांना अधिकृत पत्रके मिळावीत यासाठी श्री. देसाई यांनी खुप मेहनत घेतली आहे. तसेच अपंग लोकांसाठी असणाऱ्या सरकारी नोकरी व टेलिफोन बुथ यासांरखे हक्क प्राप्त करण्यात अपंग लोकांना येणारे अडथळे दुर करण्यात श्री. देसाई यांची मोलाची कामगिरी आहे. श्री. देसाई हे जास्तीत जास्त अपंगाना मदत पोचावी याकरता त्यांच्याजवळ असणारी अपंग लोकांची संगणकामधील माहिती नेहमी अद्यवत करत असतात.