गोरेगावकरांच्या गरजा अचूक ओळखून विविध उपक्रमांद्वारे त्या पुरविणे ही सुभाष देसाई यांची वृत्ती. शहरातील जागांचा अभाव ही सर्वज्ञात समस्या. या जागेच्या अभावामुळे अर्थातच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर व पर्यायाने त्यांच्या भावी आयुष्यातील व्यावसायीक वाटचालीवर होणे हे अपरिहार्य. ही विद्यार्थ्यांची समस्या ओळखून श्री. देसाई यांनी उपलब्ध करुन दिलेली सुविधा म्हणजेच अभ्यासिका. शैक्षणिक क्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि अभ्यासासाठी लागणार्या शांत जागांचा अभाव यांमुळे होणारा अपरिहार्य तोटा आता विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे सहन करावा लागत नाही. उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना कमी दरात अभ्यासिकेची सुविधा गोरेगावात लाभली आहे. या विशेष उपक्रमामागील उद्देश हा विद्यार्थ्यांना अभ्यासावरील लक्ष केंद्रीत करता यावे व त्यातून जास्तीत जास्त फायदा व्हावा हा आहे. अभ्यासिकेतील अंतर्भाग हा खासकरुन जास्तीत जास्त लक्ष अभ्यासावर केंद्रित करता यावे यादृष्टीने आरेखला गेला आहे. अनेक विद्यार्थी सदर अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत. |