|
 |
लोकांमधे ज्ञानाचा प्रसार करणे आणि समाजला बौध्दिक क्षेत्रे पादाक्रांत करता यावीत हे श्री. सुभाष देसाई यांच्या बोधवाक्यांपैकी एक. पुस्तक हे सर्वोत्तम शिक्षक आहेत असा त्यांचा विश्वास आहे. समाजातील लोकांना उच्च प्रतीचे वाङमयसाहित्य प्राप्त व्हावे हा एकमेव उद्देश समोर ठेवून श्री. देसाई यांनी १९७२ साली छोट्या मुलांसाठी प्रबोधनकार ठाकरे वाचनालय सुरु केले. नुकतेच २२ फेब्रु.२००९ मध्ये या वाचनालयाचे नूतनीकरण करण्य़ात आले व नवीन सुसज्ज, आसामदायी व सुनियोजित वास्तू तयार झाली. या वाचनालयात अनेकाविध सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. साहित्य, कविता, कथा, आत्मचरित्र, लहान मुले, माहिती तंत्रज्ञान, संदर्भ, इतिहास आदि विविध विषयांवरील १६००० उच्चप्रतीची पुस्तके, वाचकांना अतिशय कार्यक्षम सेवा पूरविणारी स्वयंचलित संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) यांसारखी अनेकाविध वैशिष्ट्ये असणारे हे वाचनालय गोरेगावकरांचा अभिमान ठरले आहे.
|
|