|
 |
| "एक स्त्री शिकली की पूर्ण कुटुंब शिकते" परंतु आजही बर्याच ठिकाणी स्त्रियांना अधुनिक शिक्षणापासून वंचित रहावे लागते. या समस्येचा अचूक वेध घेत श्री. देसाई यांनी संगणक प्रशिक्षण सुविधा सुरु केली. हे संगणक प्रशिक्षण श्री. देसाई यांनी माफक शुल्कात स्त्रियांना उपलब्ध करुन दिल्याने अनेक ईच्छुक स्त्रियांना याचा लाभ झाला आहे. संगणक हा आजच्या काळातील परवलीचा मंत्र. परंतु संगणक प्रशिक्षणाचे वाढते दर पाहून सर्वसामान्यपणे घरातील स्त्रिया यापासून इच्छा असूनही दूरच राहणे पसंद करतात. हीच मर्माची गोष्ट ओळखून श्री. देसाई यांनी माफक दरात स्त्रियांसाठी संगणक प्रशिक्षण वर्ग सुरु केले. या योजनेचा अनेक महिलांनी लाभ घेतला असून अनेक महिला याचा लाभ घेत आहेत. माझे गोरेगाव - मुंबईची शान हे स्वप्न साकार करण्यासाठीचे श्री. सुभाष देसाई यांचे सर्वांगीण प्रयत्न बघता त्यांचे हे स्वप्न लवकरच साकार होईल हे नि:संशय! |
|