Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Subhash Desai Shivsena Leader Goregaon
 
     
Subhash Desai Shivsena Leader सांस्कृतिक उपक्रम :-  
     
Subhash Desai Shivsena Leader आयोजित उपक्रम :-  
       
  - मुंबई फ़ेस्टिवल  
  - समर्थ उत्सव  
  - सावरकर उत्सव  
  - दिवाळी पहाट  
Subhash Desai Shivsena Leader

सप्रेम नमस्कार...
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हा आपल्या संस्कृतीचा अमोल ठेवा असल्यामुळे या सांस्कृतिक संपत्तीचे जतन करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्‍न होत राहिले पाहिजेत. आज भारतीय माणसाच्या जीवनावर पाश्चात्त्य संस्कृतीचा इतका प्रचंड पगडा बसत चालला आहे की, मूळ भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये इतिहासजमा होतात की काय अशी काळजी वाटू लागते. मात्र श्रेष्ठ जीवनमूल्ये हरवून बसण्याच्या या युगातही शास्त्रीय संगीताची मोहिनी टिकून राहिली आहे, याचे कारण सर्व सामान्यांमध्ये असलेली आत्मियता. गायन-वादन-नर्तन या तिन्ही विभागांमध्ये कठोर साधना करून आपल्या कलागुणांच्या सामर्थ्यावर संगीताची अवीट गोडी संगीत रसिकांत निर्माण करणार्‍या कलाकारांचा यात सिंहाचा वाटा आहे. गुरू-शिष्य परंपरेने ही किमया पिढ्यान्‌ पिढ्या पुढे सुरू राहिली आहे.
या थोर परंपरेची अल्पशी सेवा घडावी या हेतूने ’प्रबोधन गोरेगाव’ मुंबई फेस्टिवल चे आयोजन दर वर्षी करीत असते. पं. सुरेश तळवलकरांचे उत्तुंग व्यक्‍तिमत्व या उत्सवाची कमान वर्षामागून वर्षाला उंचावत नेत आहे. दर वर्षी संगीत जगतातील तेजस्वी तार्‍यांना एकत्र आणण्यात पंडितजी यशस्वी होतात. कलाकारांच्या कलाविष्काराचा रसिकांना मनमुराद कलानंद उपभोगता यावा हीच आयोजकांची मु़बई महोत्सवामागील भूमिका.
संगीत मैफिलींना आणखी काही उपक्रमांची जोड देखील दिल्यामुळे आनंद द्विगुणित होतो हे नि:संशय! उदा. दुर्मिळ वाद्यांचे प्रदर्शन, संगीतावरील दुर्लभ व उत्तमोत्तम पुस्तकांचे प्रदर्शन व संगीतप्रेमींच्या हृदयात अढळ स्थान असलेल्या कलाकारांच्य छायाचित्रांचे प्रदर्शन.
मुंबई फेस्टिव्हलची तयारी सुरु होताच संस्थेमध्ये व श्रोत्यांमध्ये उत्साहाचे वारे संचारते. सदर महोत्सवाचे यशस्वी आयोजन होण्यात अनेक उद्योगसमुह, जाहिरातदार, देणगीदार, स्टॉलधारक, वाहिन्या व श्रोतृवृंद यांची देखील मोलाची मदत होते.
संगीत जगतातील आनंद रसिकांपर्यंत आणणार्‍या मुंबई फेस्टीवलला आजतागायत मिळालेले यश असेच उत्तरोत्तर वाढत जावो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना!