१६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ

Subhash Desai

बेळगाव कारवारसह अखंड महाराष्ट्र झालाच पाहिजे !

बेळगाव कारवारसह अखंड महाराष्ट्र झालाच पाहिजे !

१ नोव्हेंबर हा दिवस वर्षानुवर्षे महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो.

६० वर्षे अनिर्णीत राहिलेला लक्षावधी महाराष्ट्रीय जनतेचा महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न खेडे हे घटक, भौगोलिक सलगता व १९५१ च्या शिरगणतिनुसार भाषिक बहुसंख्या या सुत्राच्या आधारे केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन त्वरीत सोडवावा.

१९६९ साली मुंबई शहरात शिवसेनेने आंदोलन केले होते. सीमा प्रश्नावर एका राजकीय पक्षाने आंदोलन केले असेल ते फक्त शिवसेना पक्षाने केलेले आहे. त्या आंदोलनात मुंबईच्या रस्त्यावर ६९ हुतात्मे झाले. माननीय बाळासाहेब ठाकरे, श्री. मनोहर जोशी आणि श्री. दत्ताजी साळवी यांना त्या आंदोलनाच्या वेळी तुरुंगात टाकण्यात आले. १० दिवस मुंबई जळत होती इतके उग्र आंदोलन पूर्वी क्वचितच झाले असेल.

महाराष्ट्र विधानसभेतील सर्व पक्षांनी अनेकदा कर्नाटक राज्याच्या अत्याचाराच्या संदर्भात एकमुखाने प्रस्ताव मंजुर केले. तत्संदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट असताना अशा रितीने त्या ठिकाणी दडपशाही करणे, कन्नड भाषा लादणे, मराठी हटविण्याचा प्रयत्न होणे, बेळगावात विधानसभा सभागृह बांधणे, बेळगाव शहराचे नाव बेळगावी असे कन्नड भाषेत करणे, असे प्रकार सुरुच आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने या संदर्भात हस्तक्षेप केला पाहिजे.

सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाचा अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत हा सीमा प्रदेश केंद्रशासित करावा, ही शिवसेनेची मागणी आहे.

सीमा प्रदेश केंद्रशासित करावा, ही महाराष्ट्र विधिमंडळाचीही एकमुखी मागणी आहे. त्या मागणीचा पाठपुरावा करणे, हे महाराष्ट्र सरकारचे कर्तव्य आहे.

बंगलोरमध्ये बेळगावचे महापौर गेले असताना त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले, महापौरांना, उप महापौरांना बदडून काढण्यात आले.

सीमा भागातील मराठी भाषिकांच्या जनतेच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातील ११ कोटी जनता त्यांच्या पाठिशी आहे.

महाराष्ट्रात शिवसेना – भाजप युतीचे सरकार येताच सीमा बांधवांना हत्तीचे बळ आले आहे व लाखो मराठी बांधवांनी एकजुटीने लढण्याचा निर्धार केला आहे.

सीमा भागात आजही असे वयोवृध्द जिगरबाज लोक आहेत की ते ४० वर्षे अनवाणीच फिरत आहेत. सीमा भाग महाराष्ट्रात आल्याशिवाय पायात वहाण घालणार नाही असा त्यांचा निर्धार आहे.

गेल्या ६० वर्षापासून मराठी सीमा बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी टोकाचा संघर्ष करीत आहेत व एक शिवसेना वगळता इतर सर्व महाराष्ट्रीय पक्ष या प्रश्नी उंटावरुन शेळ्या हाकीत आहेत.

सीमा आंदोलनातील हुतात्म्यांना त्रिवार वंदन !

Leave a Reply