Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Subhash Desai Shivsena Leader Goregaon
 
 
     
Subhash Desai - Shivsena Leader and MLA गोरेगावकरांसाठी.  
Subhash Desai Shivsena Leader   प्रमुख संदेश.  
Subhash Desai Shivsena Leader   विकासकार्ये.  
Subhash Desai Shivsena Leader   महत्वाचे दुरध्वनी क्रमांक.  
Subhash Desai Shivsena Leader   मी गोरगाव बोलतोय.  
Subhash Desai Shivsena Leader   माझे गोरेगाव मुबंईची शान  
Subhash Desai Shivsena Leader   कचरा मुक्‍त गोरेगाव  
 

महोदय,

आमदार म्हणून कार्य करीत असताना आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी गेल्या ५ वर्षाच्या कालावधीत अनेक नवीन प्रकल्प, उपक्रम तसेच लोकोपयोगी कार्यक्रम राबवून गोरेगावचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्‍न करीत आहे. ’माझे गोरेगाव- मुंबईची शान’ ही संकल्पना आपल्या सर्वांसमोर माननीय शिवसेना कार्याध्यक्ष श्री. उद्धवजी ठकरे यांचा उपस्थितीत सादर केली. या संकल्पेनेतून गोरेगावचे सौंदर्य, स्वच्छता, आरोग्य व इतर सर्व सुविधा या जास्तीत जास्त सबळ करण्याचा माझा प्रयत्‍न आहे.

गोरेगावातील अनेक चौकांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. ब्र. विश्वनाथ गुरुजी उद्यान, प्रबोधन औषधपेढी, सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढी, सिद्धार्थ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची सुरुवात असे एक ना अनेक उपक्रम व प्रकल्प आपल्या सेवेत सादर करण्यात आलेले आहेत. गोरेगावकरांचे आरोग्य सुधारण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील चांगल्या सुविधा पुरविण्याबरोबरच परिसराची स्वच्छता ठेवून सर्व गोरेगाव कचरामुक्त करण्याचे मी ठरविले आहे. या स्वच्छता मोहिमेत आपण सर्वांना सहकार्य करावे व जास्तीत जास्त जनजागृती करण्यास आपणही पुढाकार घ्यावा, ही विनंती.

स्वच्छता मोहिमेची सुरुवात म्हणून मी, सहकारी सोसायट्यांना ओला कचरा व सुका कचरा टाकण्यासाठी आधुनिक पद्धतीच्या दोन कचरापेट्या (डस्टबिन) विनामूल्य देण्याचे निश्चित केले आहे. आपल्याला या योजनेत नक्‍कीच सहभागी व्हावे असे वाटेल असा विश्वास वाटतो. कृपया माझ्याशी खाली नमुद केलेल्या पत्त्यावर संपर्क साधावा, ही विनंती.

कळावे,
आपला नम्र,

सुभाष देसाई
विधानसभा सदस्य- गोरेगाव

 

 
Message from Subhash Desai Shivsena Leader and MLA - Goregaon