"सुभाष देसाई हे चांगले अभ्यासू नेते आहेत. कायद्यापासून ते साधा फॉर्म भरण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीकडे त्यांच बारकाईने लक्ष असतं. पक्षासाठी त्यांनी महत्वाच्या जबाबदार्या पार पाडल्या आहेत. सुभाष देसाई हे विचारवंत असल्याने शिवसेनेत नेतेपदी विराजमान आहेत. प्रत्येक गोष्टीला महत्व देऊन त्याचा पाठपुरावा करुन घेण्याची त्यांची पध्दत आहे त्यामुळे इतरांच्या प्रश्नाचा पूर्ण अभ्यास करुन तो प्रश्न कसा मांडायचा याचीही कला त्यांना अवगत आहे. देसाईंनी गोरेगावात केलेली रक्तपेढी तसेच प्रबोधनच्या माध्यमातून केलेल्या कामांमुळे मी पूर्ण समाधानी आहे. "