१६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ

Subhash Desai

सुवर्ण महोत्सवी शिवसेनेला पुढच्या शताब्दीसाठी शुभेच्छा !

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्वांचे स्वागत !
आज शिवसेनेला ५०  वर्ष  पूर्ण झाली. बाळासाहेब ठाकरे नावाच्या युग पुरुषाने स्थापन केलेली ही आपली शिवसेना. किती चढउतार पाहिले काँग्रेस ने बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. संकटाच्या छाताडावर पाय रोवून उभी राहिली ती शिवसेना.
कुणी निंदा, कुणी वंदा, अमुचा जनसेवेचा धंदा . महाराष्ट्र राज्य स्थापनेला ५० वर्ष झाली, तेव्हा उद्धवजींनी रक्तदान महायज्ञ याच सभागृहांत भरविला. २५००० शिवसैनिकांनी रक्तदान केले. गिनीज बुक ने जागतिक विक्रमात त्याची नोंद केली.
एक जाणकार म्हणाला – हे फक्त  शिवसेनाच करू शकते.
शिवसेना हा नैसर्गिक पक्ष आहे. रक्तदान केल्यावर माणसाच्या शरीरात ४८ तासात नावे रक्त तयार होते. कसर भरून निघते. त्याचप्रमाणे शिवसेनेतून कोणी फुटून दूर गेले तर ४८ तासात अनेक पटींनी नवे शिवसैनिक उभे राहतात आणि निष्ठावंतांच्या अंगात हत्तीचे बळ संचारते.
महाराष्ट्रावर अभूतपूर्व अशा दुष्काळाचे संकट आले.  शिवसेना दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. शेतकऱ्यांना औजारे दिली. शेळ्यामेंढ्या दिल्या. आत्महत्याग्रस्त कुटुंबाना मदत दिली. बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेतून सामूहिक लग्ने लावून दिली.
उद्धवजींनी शिवजलक्रांती ही कल्पना राबविली संभाजीनगर, जालना, बीड , धाराशिव आणि लातूरमध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा घोषणा देत कामे केली. पहिल्या पावसातच पाणी साठले. विहिरी- तळी तुडुंब भरली. ही कामे पुढेही चालू राहतील. केलेल्या  शिवजलक्रांतीची चित्रे असलेली पुस्तिका आजच देत आहोत.
हे सर्व होत असताना गेल्या पन्नास वर्षात या यज्ञकुंडात आपल्या आयुष्याची आहुती दिल्या, त्यांना विसरणे कसे शक्य आहे? स्वतः बाळासाहेबांनी ३ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. स्वतःच्या तब्बेतीची पर्वा न करता खडतर दौरे केले. आपले उभे आयुष्य फक्त आणि फक्त शिवसेनेसाठी खर्ची घातले.
शिवसेनेचे  दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, प्रमोद नवलकर, शरद आचार्य, मधुकर सरपोतदार, दत्ताजी नलावडे यांच्या त्यागाला सीमा नव्हती.
आमदार रमेश मोरे, विठ्ठल चव्हाण, सदाकांत ढवण यांच्या शत्रूकडून हत्या झाल्या. याच औद्योगिक परिसरात भारतीय कामगार सेनेचा आवाज बुलंद करताना लक्ष्मण कांबळे आणि अशोक उतेकरसारख्या तरुण शिवसैनिक कामगारांचे खून पडले. सीमा आंदोलनात हुतात्मे शिवसेनेने दिले.
एक ना अनेक कार्यकर्त्यांच्या बलिदानातून ही शिवसेना उभी राहिली. वाढली आणि वाढतच आहे, वाढतच जाईल. त्या सर्वांच्या आठवणींना मानाचा मुजरा केल्याशिवाय हा सुवर्ण महोत्सव पूर्ण होणार नाही.
आज शिवसेनेने पहिली पन्नास वर्ष पूर्ण केली आहेत. उद्यापासून पुढच्या पन्नास वर्षात उद्धवजी आणि आदित्य या शिवसेनेला खूप उंचीवर नेतील.
शताब्दी पूर्तीसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
- (५० व्या वर्धापनदिन सोहळ्यातील भाषणातून, )

Leave a Reply